श्रीकृष्ण तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाने त्याने परमेश्वरासारखा आदरभाव संपादन केला
कृष्ण तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाच्या बळावर त्याने परमेश्वरासारखा आदरभाव संपादन केला, अशी भूमिका घेतली तर त्याने केलेल्या कृती मानवी क्षमतेच्या कक्षेत येऊन त्यांचे अनुकरण करणे शक्य होते. हा दैवी अवतरण (खाली येणे) आणि मानवी आरोहण यांच्यातील फरक आहे. कृष्णचरित्राची ही दोन प्रारूपे आपल्यापुढे आहेत. पहिल्या प्रारूपात तो भज्य, पूज्य, वंद्य ठरतो; तर दुसर्यात तो अनुकरणीय आदर्श बनतो.......